This event is Open to all
भोर : डॉ.जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ व श्री सेवा मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भोर शहरातील वेताळ पेठ येथे सुरू करण्यात आलेल्या बाह्यरुग्ण विभाग (OPD) शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शुभारंभ केले. या प्रसंगी माननीय आमदार श्री संग्रामदादा थोपटे यांच्या शुभहस्ते (OPD) चे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी भोर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, नगरसेवक गणेश पवार, अमित सागळे यांच्यासह डॉ.अमित शेठ, डॉ.पाटील, डॉ.चिल्लाळ, डॉ.डफळ, डॉ.वाघमारे, सा.कार्यकर्ते जगदीश किर्वे, राजेंद्र घोडेस्वार, संतोष केळकर, सुनील पवार आदी उपस्थित होते. डॉ.अमित राजवाडे, डॉ.विनय जोगळेकर, डॉ.ओंकार जोगळेकर, डॉ.शीला जोगळेकर, डॉ.चारुता जोगळेकर यांच्या मार्फत या ठिकाणी भोर शहर व परिसरातील नागरिकांसाठी स्त्री प्रसूतीपूर्व तपासणी व प्रसुती, गर्भाशयाचे आजार, व्यंध्यत्व व विविध स्त्री रोगांवर माफक दरात उपचार करण्यात येतील.
Venue: Vetal Peth Bhor | Joglekar Hospital
OPD Inauguration in Vetal Peth Bhor | Joglekar Hospital