Dr. Joglekar Fertility Centre Inaugurated in Shirwal, Satara
शिरवळ . ता . 1: पुणे मुंबई सारख्या महागडया दवाखान्यापेक्षा, सर्वसामान्यांना परवडणारे आययुआय ( वंध्यत्व निवारण )हे तंत्रज्ञान , ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या, जोगळेकर हॉस्पीटलने शिरवळ येथे आणले. यामुळे आता या उपचारासाठी पुण्याला उपचार घेण्याची गरज नाही . येथील आययुआय सेंटर म्हणजे वैदयकीय क्षेत्रात सोनरी हाताने लिहणारे पान ठरणार आहे . डॉ. जोगळेकर यांनी आजपर्यत ग्रामीण भागात अतिउच्च दर्जाची सेवा दिल्याने हजारो जणांचे प्राण वाचले . तर काही जण आजारातुन मुक्त झाले आहे. म्हणुन डॉ. विनय जोगळेकर यांना पद्मश्री देण्यास हरकत नसल्याचे मत विधान परिषद सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी व्यक्त केले . ते शिरवळ येथे डॉ. जोगळेकर हॉस्पीटल येथे आयोजीत कार्यक्रमात बोलत होते .
यावेळी आ.मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले,दत्तानाना ढमाळ,नितीन भरगुडे - पाटील, डॉ. विनय जोगळेकर, राजेंद्र तांबे,डॉ. सौ.शिला जोगळेकर, डॉ. ओंकार जोगळेकर, डॉ. चारुता जोगळेकर व डॉ. अमित राजवाडे,सरपंच लक्ष्मीताई पानसरे व इतर मान्यवर उपस्थित होते .
डॉ. जोगळेकर हॉस्पीटलने आजपर्यत आपल्या भागात निस्वार्थी वैद्यकीय सेवा दिली आहे . सध्याचा कोरोनासारख्या महाभंयकर रोगाचा सामना करण्यासाठी वैदयकीय क्षेत्रातील गुंतवणुक करणे अपेक्षित असल्याचे मत आ .मकरंद पाटील यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमाचे आभार डॉ. ओंकार जोगळेकर यांनी मानले. तर शेवटी डॉ.चारुता जोगळेकर यांनी पसायदान म्हणुन या कार्यक्रमाची सांगता केली.